Monday, August 4, 2025

बॅंकांकडून मिळणार आता वाढीव पीककर्ज

बॅंकांकडून मिळणार आता वाढीव पीककर्ज
सोलापूर : शेतीचे अपेक्षित उत्पन्न व हवामानाचा अंदाज, यावरून जिल्ह्यातील पीककर्जाची मर्यादा ठरविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा उतरवूनही अपेक्षित विमा रक्कम मिळत नसल्याने आता पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.

त्यामुळे आता 1 एप्रिल 2022 पासून जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव कर्ज मिळणार आहे. राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटी , कृषी विकास अधिकारी आणि मागील पीकनिहाय कर्ज मर्यादेचा अभ्यास करून त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने आता शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बॅंकांनी जिल्ह्यातील जवळपास दीड ते दोन हजार शेतकऱ्यांना कर्जवाटपही केले आहे. मात्र, आता कर्ज मर्यादा वाढविल्याने बहुतेक शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होणार आहे.
Comments
Add Comment