Sunday, October 26, 2025
Happy Diwali

कोरोना फैलाव रोखण्यासाठी निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन

कोरोना फैलाव रोखण्यासाठी निर्बंधाचे पालन करण्याचे आवाहन
ठाणे : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोव्हिड -१९ पॉझिटिव्ह रुग्णांची तसेच ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिवांनी लागू केलेले निर्बंध ठाणे जिल्हात सुद्धा लागू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी कळविले आहे. ठाणे जिल्ह्यात १० जानेवारीपासून पुढील आदेशापर्यंत राज्य शासनाने केलेले निर्बंध लागू राहणार आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यां विरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. कोवीड विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी व नव्या व्हेरियंटला रोखण्यासाठी नागरिकांनी निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी केले आहे.
Comments
Add Comment