Saturday, July 5, 2025

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील तिरंदाजांचे स्पृहणीय यश

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील तिरंदाजांचे स्पृहणीय यश
मुंबई : उरण येथे झालेल्या द्रोणागिरी स्पोर्ट्सच्या द्रोण कप आणि युवा महोत्सव २०२२मध्ये आयोजित स्पर्धेत स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील तिरंदाजी अॅकॅडमीने पाच पदके मिळवली. यामध्ये रिकर्व्ह राऊंड (महिला) वरिष्ठ गटात आदिती म्हात्रे, इंडियन राऊंड (पुरुष) नोव्हॉईस कॅटेगरीमध्ये वेंकटेश बकले, इंडियन राऊंड (महिला) गटात छाया आनंद, ऐश्वर्या महाडिक तसेच तिसऱ्या स्थानी श्वेता गोडसे आणि रितिका सकपाळ चौथ्या स्थानी आहेत.
Comments
Add Comment