Monday, May 12, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

५ पैकी ३ राज्यांत निवडणूक लढवणार

५ पैकी ३ राज्यांत निवडणूक लढवणार
५ पैकी ३ राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचं आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेते स्पष्ट केलं. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार लवकरच उत्तर प्रदेशच्या दौरावर जाणार आहेत. सध्या ५ राज्यात विधानसभा निवडणूकीचं बिगूल वाजलं आहे. या पाच पैकी ३ राज्यांत राष्ट्रवादी कॉंग्रेस निवडणूक लढवणार आहे. यूपी, गोवा आणि मणिपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचंदेखील शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.  तर मणिपूरमध्ये पाच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे.  उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन होणार, तिथल्या लोकांना बदल हवा आहे असंदेखिल यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
Comments
Add Comment