Sunday, May 18, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

सागवान तोड प्रकरणी तिघांना अटक

सागवान तोड प्रकरणी तिघांना अटक

दापोली  : दापोली तालुक्यातील वनपरिक्षेत्रात बांधतिवरे शिवाजीनगर येथे ३ सागवान प्रजातीची झाडे अनधिकृतपणे तोडल्या प्रकरणी सुनील धोपट (गिम्हवणे भोंजाळी), राजेश दुसार (बांधतिवरे वेताळवाडी), प्रमोद वाडकर (जालगाव ब्राह्मणवाडी) या तिघांना परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले.



या चोरीच्या झाडांचे चिरकाम दापोलीमध्ये केले असल्याचे आढळून आले. या प्रकरणी सॉमिल धारकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ जानेवारी रोजी घडली. परिक्षेत्र वन अधिकारी दापोली यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार ७ जानेवारी रोजी बांधतिवरे येथे वन कर्मचारी फिरती करिता गेले होते. फिरती दरम्यान शिवाजीनगर बांधतिवरे येथील ३ सागवान झाडे तोडून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा वनरक्षक बांधततिवरे यांनी गुन्हा नोंद केला.

Comments
Add Comment