Thursday, October 23, 2025
Happy Diwali

वांद्रे येथील जुना स्कायवॉक पाडून नवीन बांधणार

मुंबई : वांद्रे पूर्व येथील रेल्वे स्थानकाला लागून असलेला व एमएमआरडीएने उभारलेला स्कायवॉक पाडून पालिका नवा स्कायवॉक बांधणार आहे. २०१५ पूर्वी एमएमआरडीएने हा स्कायवॉक उभारला होता, मात्र गंजल्याने २०१९ पासून पादचाऱ्यांच्या वापरासाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी आता हा स्कायवॉक पूर्णपणे पाडून मुंबई महापालिका नव्याने स्कायवॉक बांधणार आहे. यासाठी पालिका १८ कोटी ६९ लाख रुपये खर्च करणार असून बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

दोन वर्षांपासून हा स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी बंद होता, आता अखेर दोन वर्षांनी या स्कायवॉकची नव्याने उभारणी करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >