Friday, April 25, 2025
Homeमहत्वाची बातमीविज्ञानाचा चमत्कार! मानवी शरीरात डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण

विज्ञानाचा चमत्कार! मानवी शरीरात डुकराच्या हृदयाचे प्रत्यारोपण

न्युयॉर्क : विज्ञानाच्या या आधुनिक जगात वैद्यकीय क्षेत्रात वैज्ञानिकांनी क्रांतिकारक पाऊलं उचलली असून मानवी शरीरामध्ये चक्क डुक्कराच्या हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण केले आहे. अमेरिकेतील डॉक्टरांनी हा एक असा आविष्कार आणि विज्ञानाचा चमत्कार घडवून आणला आहे, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अमेरिकेतील शल्यचिकित्सकांनी एका डुकराचे हृदय ५७ वर्षीय पुरुषामध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपित केले आहे. वैद्यकीय इतिहासात हे प्रथमच घडले आहे. या चमत्कारी प्रयोगामुळे येणाऱ्या काळात अवयवदात्यांचा तुटवडा दूर करता येईल. अनेकदा अवयव दाता उपलब्ध नसल्यास लोकांचा जीव धोक्यात येतो. पण आता ही समस्या दूर होणार आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल स्कूलने एक निवेदन जारी करून याबाबत खुलासा केला आहे. वैद्यकीय इतिहासात नवा अध्याय सुरू करणारे हे प्रत्यारोपण शुक्रवारी करण्यात आले. यापुढेही रुग्णावर उपचार करणे शक्य होईल की नाही. हे त्या रुग्णाच्या प्रकृतीवरून समजणार आहे, जरी रुग्ण बरा होत असला तरी यामुळे काहीतरी चांगले नक्कीच होण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टर रुग्णाच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असतात. जगभरातील डॉक्टरांसाठीही ही मोठी आशा आहे.

डेव्हिड मेरीलँडमध्ये राहतो. डेव्हिडने सांगितले की, त्याच्याकडे दोनच पर्याय आहेत, एकतर तो मरावा किंवा प्रत्यारोपणासाठी तयार व्हावे. डेव्हिडने आशेने सांगितले की त्याला जगायचे आहे. हे प्रत्यारोपण म्हणजे अंधारात बाण सोडल्यासारखे होते. गेल्या अनेक महिन्यांपासून डेव्हिड हार्ट-लंग बायपास मशीनच्या मदतीने अंथरुणावर पडून आहे. पण आता लवकरच ते अंथरुणातून उठतील अशी आशा त्यांना वाटत आहे.

पारंपारिक प्रत्यारोपण शक्य नसल्याने यूएस अन्न आणि औषध प्रशासनाने या आपत्कालीन प्रत्यारोपणाला शेवटचा प्रयत्न म्हणून मान्यता दिली. डेव्हिडमध्ये डुकराचे हृदय रोपण करणारे सर्जन बार्टले ग्रिफिथ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की ही यशस्वी शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे अवयवदात्यांचा तुटवडा नक्कीच दूर होईल.

यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये, एका मानवावर यशस्वी डुकराचे मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले होते. हा चमत्कार अमेरिकन डॉक्टरांनी करून दाखवला. किडनी निकामी झालेल्या जगभरातील लाखो लोकांसाठी हे प्रत्यारोपण आशादायी आहे. हा पराक्रम न्यूयॉर्क शहरातील लँगोन हेल्थ मेडिकल सेंटरमधील शल्यचिकित्सकांनी केला आहे. येथील सर्जन बऱ्याच काळापासून या दिशेने काम करत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -