नवी दिल्ली : आयपीएल २०२२ चा नवा स्पॉन्सर म्हणून टाटा ग्रुपची निवड झाली आहे. टायटल स्पॉन्सर मोबाईल कंपनी विवोची जागा घेतली आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी यांनी ही माहिती दिली.
लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवो कंपनीकडे काही वर्षे शिल्लक आहेत, परंतु या काळात टाटा ग्रुप हा मुख्य प्रायोजक राहील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोने २०१८ मध्ये वार्षिक ४४० कोटी रुपये खर्चून टायटल हक्क विकत घेतले होते. चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२० मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला. तेव्हा हे अधिकार ड्रीम इलेव्हनला हस्तांतरित केले गेले.
बीसीसीआय आणि विवो यांच्यातील पाच वर्षांचा करार २०२० हंगामापर्यंत होता आणि एका वर्षाच्या ब्रेकमुळे २०२३ पर्यंत वाढवण्यात आला होता. मंगळवारच्या बैठकीनंतर, टाटा समूह २०२२ आणि २०२३ हंगामासाठी शीर्षक प्रायोजक म्हणून कायम राहील, असा निर्णय घेण्यात आला.
विवोने आता आयपीएलचे अधिकार टाटाकडे हस्तांतरित केले आहेत. २०२२च्या हंगामासाठी ड्रीम इलेव्हन ही कंपनी आयपीएलची टायटल स्पॉन्सर होती. त्याला २२२ कोटी रुपयांचे प्रायोजकत्व अधिकार मिळाले.