मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या परेल येथील केईएम हॉस्पिटलच्या आवारातील पशू घर आणि ए.सी. प्लांट इमारतीचे नुतनीकरण करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला असून पालिका आयुक्तांनी मंजूरी द्यावी यासाठी प्रशासनाने तो पुढे पाठवला आहे.
केईएम हॉस्पिटल आवारातील पशू घर इमारत तसेच ए.सी. प्लांट इमारतीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी होत होती. दरम्यान पालिका प्रशासनाने यावर विचार केला व प्रस्ताव बनवला आहे. नूतनीकरण कामासाठी १ कोटी ९१ लाख ३० हजार ५७९ रूपये खर्च पालिकेला येणार असून हा प्रस्ताव पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांच्याकडे कोणत्याही सभेत तातडीने कामकाज म्हणून पुढे पाठवण्यची विनंती करण्यात यावी असे प्रशासनाने सुचवले आहे.
पालिका आयुक्तांकडून या कामाला परवानगी मिळताच केईएम हॉस्पिटलच्या आवारातील पशू घर इमारतीचा व ए. सी. प्लांट इमारतीचे देखील नुतनीकरण होणार आहे.