कोरियाच्या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी बिनाले स्पर्धेमध्ये भारतीय सुलेखन कलेचा गौरव

मुंबई : कोरियाच्या १८ व्या 'चिऑन्गजू जिकजी' आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफी बिनाले स्पर्धेमध्ये भारतीय सुलेखन कलेचा गौरव करण्यात आला. 'कोरियन आर्ट म्युझिअम' या कलादालनात २३ डिसेंबर २०२१ ते २८ डिसेंबर २०२१ या दरम्यान आयोजित केलेल्या १८व्या 'चिऑन्गजू जिकजी' जागतिक अक्षर सुलेखन स्पर्धेमध्ये भारतातील ४० सुलेखनकारांनी मिळून विविध भाषेतील ७१ कलाकृती पाठविल्या होत्या. यापैकी सुलेखनकार अच्युत पालव, नारायण भट्टाथिरी यांच्याबरोबरच अक्षया ठोंबरे, रूपाली ठोंबरे आणि शुभांगी गाडे या भारतीय कलाकारांच्या कलाकृतींना पारितोषिके मिळालेली आहेत.



या स्पर्धेसाठी शांती, ऐक्य, प्रेम अशा विविध विषयांवर चित्रे मागविली होती. विशेष म्हणजे कोरियाची पारंपरिक पद्धत जपण्यासाठी सहभागी कलाकारांसाठी कोरियन पेपर खास पाठविण्यात आला होता. त्यामुळे भारतीय कॅलिग्राफरना काम करण्यासाठी उत्साह आला.
'चिऑन्गजू जिकजी' जागतिक अक्षर सुलेखन स्पर्धा फक्त जिकजी आणि हंन्गूल या शहरांचा जगाला परिचय करून देण्यासाठी नसून सुलेखन या त्यांच्या केंद्रीय प्रदेशातील एकमात्र सांस्कृतिक वारसा असलेल्या कलेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. यात अनेक देशांतील सुलेखनकारांनी आपापल्या लिपीत कलाकृती सादर केल्या.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना