Sunday, October 26, 2025
Happy Diwali

अरे बापरे! अमेरिकेत एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडले

अरे बापरे! अमेरिकेत एकाच दिवशी १० लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडले

न्यूयॉर्क : अमेरिकेत एकाच दिवशी १० लाख १० हजार इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत जगात एकाच दिवशी एवढी मोठी रुग्णसंख्या पहिल्यांदाच नोंदविली गेली आहे. अमेरिकेत वेगाने वाढणाऱ्या ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा प्रसार कमी झाल्याचे दिसत नाही.

याआधी ३ जानेवारीला रुग्णसंख्या वाढीचा विक्रम दहा लाख ३ हजार इतका नोंदविला गेला होता. सात दिवसांची सरासरी काढल्यास दोन आठवड्यात तिप्पट कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.

जवळपास सात लाख नवीन बाधित एका दिवसात होत आहेत. सर्व राज्यांनी सोमवारी रुग्णसंख्या नोंदवली नाही आणि त्यामुळे शेवटचा आकडा यापेक्षा अधिक असू शकतो.

दवाखान्यात दाखल होणाऱ्या कोविड रुग्णसंख्या ही मोठी आहे. ही संख्या तीन आठवड्यात दुप्पट झाली आहे. दुसरीकडे ओमायक्रॉन कमी धोकादायक दिसतोय. आरोग्य अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की संसर्गाचा वेग वाढत असल्यामुळे दवाखान्यांवर ताण येऊ शकतो. काहींनी तर रुग्णसेवा स्थगित केल्या असून वाढती रुग्णसंख्या कशी हाताळायचे आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आदींशी आरोग्य यंत्रणा तोंड देत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कामकाजावर परिणाम झाला आहे.

दुसरीकडे कर्मचारी, शिक्षक आणि बसचालक अनुपस्थित राहत आहेत. शिकागोने शिकवणी वर्ग सलग चौथ्या दिवशी रद्द केल्या आहेत. न्यूयॉर्क शहराने तीन उपनगरीय रेल्वेलाईन्स स्थगित केल्या आहेत. कारण मोठ्या प्रमाणावर कामगार बाधित होत आहेत. प्रत्येक दिवशी सरासरी मृत्यूदर १,७०० इतका आहे. कोरोना लशीत नवीन बदल करण्याची गरज असून जे ओमायक्रॉनला टक्कर देऊ शकेल. फायझर कंपनीच्या सीईओने सोमवारी सांगितले, की कंपनी येत्या मार्चमध्ये तशी लस आणेल.

Comments
Add Comment