Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीमाथेरानमध्ये लॉकडाऊन नको...

माथेरानमध्ये लॉकडाऊन नको…

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची मागणी

माथेरान: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पर्यटन क्षेत्रे संपूर्ण बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे माथेरानमधील नागरिकांना याची झळ सोसावी लागणार आहे. याकामी शिवसेना, काँग्रेस आणि शेकापच्या पदाधिकारी आणि शिष्टमंडळाने आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेतली. तसेच आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधून माथेरानमधील पर्यटन सुरू ठेवण्याबाबत सहानूभूती पूर्वक विचार करावा असे स्पष्ट केले. याठिकाणी अन्य व्यवसायाचे साधन उपलब्ध नाही. केवळ पर्यटनावर अवलंबून असलेले हे स्थळ आहे. नव्वद टक्के लोक हे कष्टकरी आहेत.

लॉक डाऊन केल्यास कष्टकरी श्रमिकांच्या जीवन – मरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. राज्यात सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध जाहीर करण्यात येत आहेत.अनेक पर्यटनस्थळे सुध्दा यामध्ये समाविष्ट केली जात आहेत. परंतु माथेरान हे असे एकमेव ठिकाण आहे की या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांवर सर्वांचे जनजीवन अवलंबून असते. कारण येथे शेती त्याचप्रमाणे अन्य औद्योगिक क्षेत्र, कंपनी अथवा कारखाने नाहीत. त्यामुळे येथील सर्वच कष्टकरी बांधव यामध्ये अश्वपाल, हातरीक्षा चालकवर्ग तसेच हमाली करणारे मजूर, लहान – मोठे स्टॉलधारक यांचे हातावर पोट असते.

त्याचप्रमाणे व्यापारीवर्गही येथे मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊन केल्यास आम्हा सर्वांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल. तरी लॉकडाऊन करताना काही नियम – अटी असल्या तर हरकत नाही. परंतु पूर्ण लॉकडाऊन केल्यास येथील नागरिकांना खूप त्रासदायक ठरणार आहे. याकामी आपल्या माध्यमातून वरिष्ठांना येथील संपूर्ण परिस्थिती लक्षात आणून दिल्यास हे पर्यटनस्थळ सुरू राहील असेही शिष्टमंडळाने आमदार थोरवे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, उप शहर प्रमुख प्रमोद नायक, सामजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मनोज खेडकर, शेकापचे अध्यक्ष शफीक बढाणे,उमेश कदम,वन समिती अध्यक्ष योगेश जाधव, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे, पतसंस्था सभापती हेमंत पवार,संदीप शिंदे, गौरंग वाघेला,धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांच्यासह अन्य माथेरानकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -