'मिसेस मुख्यमंत्री'ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार 'दिशाभूल'

मुंबई : ‘मिसेस मुख्यमंत्री'' या लोकप्रिय दूरचित्रवाणी मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे आणि ‘सुमी’चा लाडका ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या नव्या वर्षात अमृता धोंगडे आणि तेजस बर्वे यांची जोडी छोट्या नाही तर मोठ्या पडद्यावर पेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘दिशाभूल’ आहे.


सानवी प्रॉडक्शन हाऊस निर्मित आणि आशिष कैलास जैन दिग्दर्शित ‘दिशाभूल’ या चित्रपटाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पुण्यात पार पडला. यावेळी अभिनेता तेजस बर्वे, निर्मात्या आरती चव्हाण, नीलेश आर. विनोद नाईक, ऍड. प्रज्ञावंत गायकवाड, गोपाळ कडावत, संगीतकार प्रथमेश धोंगडे, गीतकार हरिभाऊ धोंगडे, नृत्य दिग्दर्शक नील राठोड, कला दिग्दर्शक वैभव शिरोळकर, वेशभूषाकार शीतल माहेश्वरी यांच्यासह चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.


चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आशिष कैलास जैन म्हणाले की, ‘दिशाभूल’ हा आजच्या तरुणाईचा चित्रपट आहे. कॉलेजमधील मुलांची ही अनोखी कथा असून यामध्ये फ्रेंडशिप, रोमान्स आणि सस्पेन्स थ्रीलर यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळणार आहे. ‘दिशाभूल’ मध्ये अमृता धोंगडे, तेजस बर्वेसह आणखी एक जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


निर्मात्या आरती चव्हाण म्हणाल्या, ‘दिशाभूल’ हा सानवी प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट आहे. नवीन वर्षांची सुरुवात एका मराठी चित्रपटसह करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्ही अमृता आणि तेजस यांच्यासह मराठीतील नामवंत कलाकारांना एकत्र घेऊन एक वेगळा प्रयोग करत आहोत, त्याला प्रेक्षक साथ देतील असा विश्वास वाटतो.

Comments
Add Comment

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय

जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा : ‘अभंग तुकाराम’

मुंबई : महाराष्ट्राला संत-महात्म्यांची उज्ज्वल परंपरा आहे. माऊलींच्या ज्ञानेश्वरीने महाराष्ट्राच्या

साईबाबांची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. सेप्टिक

‘द फॅमिली मॅन ३’ लवकरच प्रेक्षकांसमोर; प्राइम व्हिडिओने केली अधिकृत घोषणा

मुंबई : प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर प्राइम व्हिडिओने बहुचर्चित आणि सुपरहिट वेब सिरीज ‘द फॅमिली