Wednesday, July 9, 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी महामृत्युंजय जप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी महामृत्युंजय जप
डोंबिवली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेबाबत खोडसाळपणा करण्यात आला. पंजाबचे कॉंग्रेस सरकार आणि पोलीस प्रशासनाने पंतप्रधान मोदी यांच्याबाबत योग्य ती दखल घेतली नाही. दरम्यान काही आंदोलकांनी पंतप्रधानांचा रस्ता अडवून त्यांच्या सुरक्षेवर आघात केला असा आरोप भाजपा करीत आहे. या घटनाक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना दीर्घायुष्य लाभो यासाठी डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली महामृत्युंजय जप आयोजित करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अरिष्ट्य टळावे व त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी भाजपा ग्रामीण मंडल कार्यालय, डोंबिवली येथे महामृत्युंजय जप व हवनाचा विधी संपन्न झाला. यावेळी आमदार रविंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर परब, युवा मोर्चाचे मितेश पेणकर, पूर्व मंडळाचे अध्यक्ष नंदू जोशी व प्रभाग क्रमांक ८५ चे अध्यक्ष संतोष शुक्ला, प्रभाग क्रमांक ११२ च्या अध्यक्षा राजश्री पैंजणकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी श्री महादेवाकडे नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >