Wednesday, April 30, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल

मुंबई : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवत आहेत. मात्र, त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. लता मंगेशक यांचे वय ९२ वर्ष असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.

मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याच स्पष्ट झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. लता मंगेशकर यांचे वय पाहता होम क्वारंटाईन करणे शक्य नसल्याने त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच खबरदारी म्हणून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लता मंगेशकर यांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे उषा मंगेशकर यांनी सांगितले होते.

Comments
Add Comment