Thursday, September 18, 2025

लालचंद राजपूत यांनाही विषाणूची बाधा

लालचंद राजपूत यांनाही विषाणूची बाधा
झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक लालचंद राजपूतही कोरोना विषाणूच्या विळख्यात आले आहेत. भारताचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर त्यांना एका हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेचे फिजिओ अर्जुन डी सिल्वा यांनी राजपूत करोना पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी केली आहे. ६० वर्षीय राजपूत देखील आयसोलेशन प्रोटोकॉलमुळे पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांचा भाग बनू शकणार नाही. डगआऊटमध्ये त्याची अनुपस्थिती क्रेग इर्विनच्या नेतृत्वाखालील संघासाठी कठीण होऊ शकते. श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिला वनडे सामना १६ जानेवारीला खेळला जाणार आहे. दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना अनुक्रमे १८ आणि २१ जानेवारीला होईल.
Comments
Add Comment