न्यूझीलंडकडून ‘बांगला टायगर्स’ची शिकार

ख्राइस्टचर्च : दुसरी आणि अंतिम कसोटी अवघ्या तीन दिवसांत एक डाव आणि ११७ धावांनी जिंकताना न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरी सोडवली. फॉलोऑननंतर ३९५ धावांनी पिछाडीवर पडलेल्या पाहुण्यांचा दुसरा डाव २७८ धावांवर आटोपला. द्विशतकी खेळी साकारणारा न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला सामनावीर आणि डेवॉन कॉन्व्हेला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.



पहिल्या डाव अतिशय सुमार कामगिरी करणाऱ्या वरच्या आणि मधल्या फळीतील बांगलादेशी फलंदाजांना दुसऱ्या डावात चांगली सुरुवात मिळाली. पहिल्या चार फलंदाजांनी अनुक्रमे २१, २४, २९ आणि ३७ धावा केल्या तरी त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. चौथ्या क्रमांकावरील लिटन दासने मात्र एकाकी किल्ला लढवला. त्याने ११४ चेंडूंचा सामना करत १०२ धावांची खेळी करताना पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला. दासच्या शतकी खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मात्र, काइल जॅमिसनसह (४ विकेट) नील वॅग्नरने (३ विकेट) अचूक मारा करताना मधली फळी मोडीत काढली. मधल्या फळीत नरूल हसनचे सर्वाधिक ३६ धावांचे योगदान राहिले.



महत्त्वाची बाब म्हणजे, कारकीर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या रॉस टेलरने बांगलादेशच्या डावातील शेवटची, दहावी विकेट टिपत संघाला विजय मिळवून दिला आणि आपल्या कसोटी कारकिर्दीला यशस्वी पूर्णविराम दिला. त्याने केवळ ३ चेंडू टाकले त्यातच त्याने शेवटची विकेट मिळवली. हा त्याची कसोटी कारकिर्दीतील ही केवळ तिसरी विकेट आहे.



तत्पूर्वी, न्यूझीलंडने ६ विकेट गमावून ५२१ धावांवर पहिला डाव घोषित केला. कर्णधार टॉम लॅथमने (२५२ धावा) शानदार द्विशतक झळकावले. त्याला डेवॉन कॉन्व्हेची (१०९ धावा) सुरेख साथ लाभली. किवींच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद केले तरी टॉम लॅथमला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. डेवॉन कॉन्व्हे मालिकावीर ठरला.



दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी बांगलादेशने जिंकल्यानंतर न्यूझीलंडने दुसरी कसोटी जिंकत हिशेब चुकता केला. न्यूझीलंडच्या भूमीवर त्यांनाच पराभूत करत बांगलादेशने यजमानांना धक्का दिला होता. पण दुसऱ्या कसोटीत 'टेस्ट चॅम्पियन्स'नी दमदार खेळ करत संघाला एकतर्फी मोठा विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे, पहिल्या कसोटीत पराभवाचा धक्का देणाऱ्या बांगलादेशी खेळाडूंना न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत अवघ्या तीन दिवसात धूळ चारली.
.............


Comments
Add Comment

Asia cup 2025: आज ओमानविरुद्ध भारताचा सामना, प्लेईंग ११मध्ये होऊ शकतात हे बदल

अबुधाबी: आशिया कप २०२५ मध्ये भारताने 'सुपर-४' फेरीसाठी आधीच पात्र ठरल्यामुळे, आज ओमानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात

आशिया कप २०२५: सुपर-४ चे संघ ठरले, पाहा असे असेल वेळापत्रक

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर-४ फेरीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. ग्रुप स्टेजमधील थरारक सामन्यांनंतर

६,६,६,६,६- श्रीलंकेविरुद्ध अफगाणच्या या क्रिकेटरने केली कमाल

अबू धाबी: आशिया कप २०२५ मध्ये श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील 'करो वा मरो' सामन्यात अफगाणिस्तानचा अनुभवी

नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमला मैदानात दिला नाही भाव

मुंबई: जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५मध्ये आज भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये सगळ्यांच्या नजरा नीरज

IND vs PAK : हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला!

मुंबई : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन करण्यास नकार

India A vs Australia A : ध्रुव जुरेलची कमाल, ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध ठोकले शतक

लखनऊ: ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव