Thursday, July 18, 2024
Homeदेशपक्षभेद विसरून महिला सन्मानासाठी आवाज उठवावा

पक्षभेद विसरून महिला सन्मानासाठी आवाज उठवावा

गुरुवारच्या मिटिंगला उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

नवी दिल्ली, : सोशल मीडियावर महिलांचा सन्मान राखला जात नाही, मग त्या कुठल्याही धर्माच्या असोत, अशी खंत व्यक्त करतानाच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, या विरोधात पक्षीय राजकारण विसरुन सर्वांनी आवाज उठवायला हवा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
इंटरनेट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांच्या सुरक्षेसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालय आणि दूरसंचार विभागासोबत सक्रीय स्वरुपात काम करत आहे. तसेच लोकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून याला विरोध करण्यासाठी एकत्र यायला हवे असे आवाहनही इराणी यांनी केले. बुली बाई अॅप, अभिनेता सिद्धार्थचे सायना नेहवालविरोधातील आक्षेपार्ह ट्वीट तसेच दिल्लीतील निर्भया केससंदर्भात इराणी यांनी चर्चा केली. यानंतर महिलांना एका अॅपच्या माध्यमातून केवळ लैंगिक भावनेतूनच पाहिले जातये का ? असा सवालही त्यांनी केला.

सध्या महिलांची सरसकट एका विशिष्ट भावनेतून सोशल मीडियावर बदनामी केली जात आहे, त्यासाठी कुठल्याही प्रकारचा धर्म पाहिला जात नाहीए. पण मी पोलिसांचे आभार मानेन की त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्यांना शिक्षा मिळेल याची मला खात्री आहे. पोलीस आणि न्याय व्यवस्थेत महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक प्रकरणं समोर येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. तसेच या मुद्यावर लोकांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरजही केंद्रीयमंत्री इराणी यांनी व्यक्त केली.

भारतात महिलांचे लग्नाचे वय वाढवणाऱ्या विधेयकाबाबत बोलताना इराणी म्हणाल्या की, मी संसदेत मुलींचं लग्नाचं वय २१व्या वर्षापर्यंत वाढवण्याची मागणी केली तेव्हा मला देशभरातून पाठिंबा मिळाला. पण मुलींचे लग्नाच वय वाढवण्यामागे एका समाजावर गु्न्हेगारी ठपका ठेवण्याचा डाव असल्याच्या केवळ अफवा आहेत. ज्या लोकांना महिलांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवायचे आहे तेच अशा अफवा पसरवत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
……….

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -