

शशांक आणि अपूर्वाच्या केळवणासाठी पाहुणी म्हणून हजेरी लावणार आहे रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा. जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. या दोघांचं केळवणही हटके असणार हे वेगळं सांगायला नको. त्यामुळेच या दोघांच्या केळवणात आनंदाचे रंग भरण्यासाठी दीपा खास हजेरी लावणार आहे.
