Monday, August 4, 2025

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट, जाणून घ्या आजचा आकडा

कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट, जाणून घ्या आजचा आकडा
मुंबई : जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाच्या रुग्णसंख्ते झपाट्याने वाढ होत होती. काही दिवसांपूर्वी रुग्णसंख्तेत सतत वाढ होत असल्यामुळे मुंबईकराची चिंता वाढली होती पण आज रुग्णसंख्येत घट दिसून आली.  11 हजार 647 नवे कोरोनाबाधित सापडल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मिळाला आहे. नुकत्याच पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत 11 हजार 647 नवे कोरोनाबाधित समोर आले असून दोन जणांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी तब्बल 14  हजार 980 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्क्यांवर कायम राहिला असून मागील 24 तासांत दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 413 झाली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >