Tuesday, July 1, 2025

ब्रेडच्या किंमतीत २ ते ५ रुपयांनी वाढ

ब्रेडच्या किंमतीत २ ते ५ रुपयांनी वाढ

मुंबई : रोजच्या नाश्तामध्ये आवडीचा असलेला ब्रेड आता महाग झाला आहे.  स्लाईस ब्रेडच्या किंमती आता 2 ते 5 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपसूकपणे ब्रेडपासून बनवण्यात येणारे सँडविच, ब्रेड जॅम, ब्रेट बटर यांच्या किंमतीतही आता वाढ होणार आहे  वाढत्या महागाईचा फटका आता ब्रेडला बसल्याने  मुंबईकर मात्र नाराज आहे.


इंधन दरवाढ, गॅस दरवाढ या सर्वांचे थेट परिणाम ब्रेडच्या दरांवर झाले आहेत. त्यामुळे ब्राऊ ब्रेडही 3 ते 5 रुपयांनी महागला आहे. सर्वच कंपन्यांच्या ब्रेडचे दर तब्बल 15 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत. 







Comments
Add Comment