Sunday, October 19, 2025
Happy Diwali

तीन दुचाकींची चोरी

तीन दुचाकींची चोरी
नाशिक : शहरात नुकत्याच वेगवेगळ्या ठिकाणांहून तीन दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुचाकीचोरीची पहिली घटना पाटीलनगर येथे घडली. फिर्यादी कैलास रावसाहेब काळे (रा. शिवशंकर चौक, सिडको, नाशिक) हे दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता पाटीलनगर येथील मनपसंत स्वीट्स येथे आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी पार्क केली होती. ही दुचाकी चोरट्याने त्यांची नजर चुकवून चोरून नेली. काळे हे दुचाकी घेण्यासाठी आले असता त्यांना ती जागेवर दिसून आली नाही. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीची फिर्याद नोंदविण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक बनतोडे करीत आहेत. दुचाकीचोरीची दुसरी घटना त्रिमूर्ती चौकात घडली. फिर्यादी अनिकेत नंदकुमार निकम, पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको यांनी दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता राहत्या घरासमोर दुचाकी पार्क केली होती. ही दुचाकी चोरट्याने त्यांची नजर चुकवून चोरून नेली. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आजूबाजूला चौकशी केली; मात्र ती मिळून आली नाही. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीची फिर्याद नोंदविण्यात आली असून, पुढील तपास पोलीस नाईक गवळी करीत आहेत.
Comments
Add Comment