नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. नवी दिल्लीतील संसर्गाचे प्रमाण २५ टक्क्यांवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा म्हणजेच वर्क फ्रॉम होम आदेश काढला आहे. याशिवाय रेस्टॉरंट आणि बार बंद करण्याचेही आदेश काढण्यात आले आहेत. मात्र पार्सल सुविधा सुरु ठेवण्यात आली आहे.
https://twitter.com/ANI/status/1480775356156039168?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1480776538144469002%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es2_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Fprivate-offices-in-delhi-shall-be-closed-barring-the-ones-in-the-exempted-category-work-from-home-shall-be-followed-ddma%2Fनवी दिल्लीत २४ तासांत कोरोना विषाणूचे १९ हजार १६६ नवीन रुग्ण आढळले आहेत. दिल्लीतील संसर्गाचे प्रमाण आता २५ टक्क्यांवर पोहोचले आहे. अहवालानुसार, चाचणी घेणाऱ्या प्रत्येक चौथ्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून येते आहे. या पार्श्वभूमीवर DDMA ने दिल्लीतील सर्व खाजगी कार्यालये बंद करण्याचे आदेश दिले आहेत व सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा म्हणजेच वर्क फ्रॉम होम आदेश काढला आहे.






