Monday, August 4, 2025

आधारवाडी जेलमधील ३५ कैद्यांसह ५ कर्मचारी बाधित

आधारवाडी जेलमधील ३५ कैद्यांसह ५ कर्मचारी बाधित

कल्याण : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेलमध्ये ३५ कैद्यांसह ५ कर्मचारी, अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली आहे.
आधारवाडी जेलमध्ये सध्या पंधराशेपेक्षा अधिक कैदी असून ३५ कैद्यांसह ५ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे जेल अधीक्षक यांनी सांगितले. कोरोना बाधित कैद्यांची प्रकृती ठीक असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.



वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी आधारवाडी जेलमधील कैद्यांची, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी ३५ कैद्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले असून कारागृहातील सर्वच कैद्यांचे कोवीड लसीकरण पूर्ण झाले आहे. तर सोमवारपासून बूस्टरचे लसीकरण सुरू असतानाच हा प्रकार समोर आला असून कोवीड रुग्ण सापडल्यानंतर जेलमध्ये सॅनिटायझर करण्यात आले. तसेच एखाद्या कैद्याला थंडी ताप आल्यास जेलमध्ये विलगीकरण कक्षही बनविण्यात आला असून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी ठेवण्यात येते.



तसेच डॉन बॉस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्याबाबत जिल्हा अधिकारी यांच्याकडे मागणी केली असून उर्वरित सर्व कैद्यांना पोषक आहार देण्यात येत असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >