
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संखय ५१ हजार ७८८ झाली आहे. आज ११६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार ८३२ झाली आहे.
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली असून ती आता ५७८ झाली आहे. सर्वात जास्त १२९ रुग्ण कुडाळ तालुक्यात आहेत. आज सर्वाधिक रुग्ण मालवण तालुक्यात २१ तर कणकवली तालुक्यात २० आढळून आले. कोव्हीड-१९ मुळे आज कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ४६५ वर स्थिर आहे. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.