Thursday, June 12, 2025

पवारांना अद्याप वेळ का मिळाला नाही?

पवारांना अद्याप वेळ का मिळाला नाही?

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. संपामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचे हाल होताहेत, हे सरकारला आत्ता समजले? लाल परी धावत नसल्याने ग्रामीण भागातली प्रवास व्यवस्था लंगडी झाली आहे. त्याकडे लक्ष द्यायला शरद पवार यांना आजवर का वेळ झाला नाही? आजचा मुहूर्त होता का? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले आहे.


तसेच, बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी मनोरंजन केले. एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही, असे परब सांगतात. मग आजवर कारवाई झालेल्यांचे काय? कारवाईची भीती मविआ सरकारवरील अविश्वासातून निर्माण होते आहे. कारवाई नाही, पगारवाढीसाठी चर्चा करू, विलिनीकरणाचे कोर्ट सांगेल ते पाहू... मग मविआ सरकारकडे कर्मचाऱ्यांसाठी आहेच काय?’, असाही प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.

Comments
Add Comment