
१२ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रम्हांड, विजयनगरी, गायमुख, बाळकुम, समतानगर, आकृती, सिद्धेश्वर, जॉन्सन, इंटर्निटी, कोलशेत तसेच आझादनगर या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच बुधवार १२ जानेवारी, २०२२ रोजी सकाळी ९.०० ते गुरुवार १३ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यंत ऋतुपार्क, जेल, साकेत, रुस्तमजी, कळवा व मुंब्रा परिसरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा साठा करून पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.