Wednesday, April 30, 2025

देशमहत्वाची बातमी

राज्यांनो सावध व्हा, परिस्थिती भयंकर होऊ शकते...

राज्यांनो सावध व्हा, परिस्थिती भयंकर होऊ शकते...

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना गंभीर इशारा दिला आहे. देशात सध्या फक्त ५ ते १० टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. मात्र, परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, असा इशारा केंद्र सरकारने दिला. केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहिले आहे. दुसऱ्या लाटेत २० ते २३ टक्के अॅक्टिव्ह रुग्णांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता होती. या तुलनेत सध्या फक्त ५ ते १० टक्के अॅक्टिव्ह रुग्णांनाच हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. अशी स्थिती असली तरी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सध्याची परिस्थिती पाहता काहीही ठोस सांगता येऊ शकत नाही. येत्या काळात परिस्थिती बदलून भयंकर होऊ शकते. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या अचानक वाढूही शकते, असे केंद्र सरकार म्हणाले. एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलेले रुग्ण, होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेडची स्थिती, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट यावर रोज बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना केंद्राने केली आहे. देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने राज्यांना या सूचना दिल्या आहेत.

Comments
Add Comment