Saturday, June 21, 2025

समाजस्वास्थ्यासाठी ‘सौरयाग’ अनुष्ठान

समाजस्वास्थ्यासाठी ‘सौरयाग’ अनुष्ठान

नवीन पनवेल  :अनुष्ठान मंडळ, पनवेल यांच्या वतीने समाजस्वास्थ्यासाठी नुकतेच ‘सौरयाग’ अनुष्ठान संपन्न झाले. कोविड नियमांचे पालन करून बल्लाळेश्वर मंदिरामध्ये हे अनुष्ठान संपन्न झाले. अनुष्ठान काळामध्ये नित्य होमहवन, दीपोत्सव, सतीश रानडे व सहकारी यांची भजनसेवा, सत्यसूर्यपूजन, नित्य आरती, मंत्रपुष्प अष्टावधान सेवा, नामसंकीर्तन, बलिदान, पूर्णाहूती आदी धार्मिक विधी संपन्न झाले. वेदमूर्ती उदयराज जोशी यांनी आचार्य म्हणून काम पाहिले. गणेश व सुखदा घाणेकर यांनी यजमानपद भूषविले.
हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी वेदमूर्ती शैलेश करंदीकर, ललित बर्वे, समीर भट, पुष्कर लिमये आदींसह सर्व सभासद व महिला वर्गाने मोलाचे योगदान दिले.



पनवेलमधील पुरोहित मंडळींनी पुढाकार घेऊन अनुष्ठान मंडळ स्थापन केले असून प्रतिवर्षी जनकल्याणाच्या हेतूने विविध प्रकारची अनुष्ठाने करण्यात येतात. मंडळाचे यंदाचे हे १९ वे अनुष्ठान आहे.

Comments
Add Comment