मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या आणि बिग बॉस मराठीतील तिसऱ्या पर्वाच्या स्पर्धक तृप्ती देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कोरोना झाल्याची माहिती दिली.
अखेर ”कोरोनाने” मला गाठलचं. माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. चाहत्यांची भेटायला गर्दी … परंतु, नियमांचे पालन मी करीत होते. जेंव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही, अशी पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली.माझी तब्येत व्यवस्थित आहे. काळजी करू नये. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.