Monday, July 15, 2024
Homeक्रीडानोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा

नोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा

ऑस्ट्रेलिया सरकारला कोर्टाचा झटका

मेलबर्न  : विश्वातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचच्या ऑस्ट्रेलियातून परत पाठवणीच्या खटल्यावर मेलबर्न कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाने ऑस्ट्रेलिया सरकारकडून नोव्हाक जोकोव्हिचचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे कोर्टाने सांगितले.
कोर्टाने नोव्हाक जोकोव्हिचचा पासपोर्ट आणि इतर सामान परत करण्याचा आदेश दिला आहे. मात्र कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही देशाच्या गृहमंत्र्यांनी आमच्याकडे अद्यापही नोव्हाक जोकोव्हिचला ऑस्ट्रेलियाबाहेर पाठवण्याची ताकद आहे, त्यामुळे यासंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल असे म्हटले आहे. दुसरीकडे जोकोव्हिच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होणार ही नाही? याबाबत उशीरापर्यंत स्पष्टता नव्हती.

लसीकरणातून वैद्यकीय सवलत मिळाल्यावर जोकोव्हिच ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बुधवारी मेलबर्नमध्ये दाखल झाला होता. मात्र, आठ तासांहून अधिक वेळ त्याला विमानतळावरच थांबवण्यात आले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या परदेशी नागरिकांनाच ऑस्ट्रेलियात प्रवेशाची परवानगी आहे. लसीकरणाचा नियम न पाळल्याने ऑस्ट्रेलियन सीमा सुरक्षा दलाने जोकोव्हिचचा व्हिसा रद्द केला होता. त्यानंतर त्याला अवैध स्थलांतरितांच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले.

न्यायालयाने जोकोव्हिचचा व्हिसा पुनरावलोकन आणि परत पाठवणीचा निर्णय सोमवापर्यंत प्रलंबित ठेवला होता. जोकोव्हिचच्या परत पाठवणीला आव्हान देण्यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात काही कागदपत्रे सुपूर्द केली. ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’ संघटनेने त्याला १ जानेवारीला लसीकरणात वैद्यकीय सवलत मिळाल्याचे प्रमाणपत्र दिले. काही दिवसांपूर्वीच कोरोनातून बरा झाल्याने ही सवलत मिळाल्याचा त्यात उल्लेख असल्याचा दावा वकिलांनी केला होता. ‘‘१६ डिसेंबर २०२१ रोजी जोकोव्हिचच्या कोरोना चाचणीचा अहवाल पहिल्यांदा सकारात्मक आला होता. मागील ७२ तासांत ताप किंवा अन्य कोणतीही लक्षणे नाहीत,’’ असे वैद्यकीय सवलतीच्या प्रमाणपत्रात म्हटले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -