चेन्नई : सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप नेत्या खुशबू सुंदर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: खुशबू यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
या संदर्भात ट्वीटरद्वारे खुशबू सुंदर म्हणाल्या की, कोरोनाच्या दोन लाटांना हुलकावणी दिल्यानंतर शेवटी मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कालपर्यंत माझा अहवाल नकारात्मक होता. मात्र नाक वाहत असल्याने चाचणी करून घेतली. मी स्वतःला विलगीकृत केले आहे. मला एकटे राहण्यास आवडत नाही. त्यामुळे पुढील 5 दिवस माझे मनोरंजन करीत राहा. आणि, लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्या. अशा शब्दात त्यांनी चाहत्यांशी संवाद साधला आहे.