Wednesday, July 2, 2025

बैलगाडा शर्यतीत देवरुखच्या बने यांची गाडी प्रथम

बैलगाडा शर्यतीत देवरुखच्या बने यांची गाडी प्रथम

वैभववाडी : बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नाधवडे आयोजित पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत समीर बने, देवरुख ता. संगमेश्वर यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक द्वारकानाथ माने ता. लांजा यांनी पटकावला. तर तृतीय क्रमांक राजाराम चव्हाण ता. संगमेश्वर यांनी पटकावला. या स्पर्धेत रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता.



बैलगाडा शर्यतीला परवानगी शासनाकडून मिळाल्यानंतर कोकणात पहिली स्पर्धा नाधवडे येथे पार पडली. स्पर्धा जाहीर होताच प्रशासन खडबडून जागे झाले होते. स्पर्धेच्या ठिकाणी सकाळपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन तसेच बक्षीस वितरण अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते पार पडले.



यावेळी वैभववाडी सभापती अक्षता डाफळे, देवगड सभापती रवी पाळेकर, कणकवली सभापती मनोज रावराणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, तुळशीदास रावराणे, कानडे, बाळा जठार, बाप्पी मांजरेकर, प्रकाश पारकर, सरपंच कुडतरकर, बंड्या मांजरेकर, सुधीर नकाशे व नाधवडेतील पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment