Wednesday, May 21, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

सीमा दाते



मुंबई : सध्या मुंबईत ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी रांगा लावत आहेत. दरम्यान वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पालिकेने प्रत्येक विभागात फिव्हर क्लिनिक सुरू केले आहे.
मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्णांची मोठ्या प्रमाणात नोंद होत असून बदललेल्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला, घसा दुखीचेही रुग्ण वाढले आहेत. यापैकी काही लक्षणे कोरोनाची असून सर्वसामान्य विषाणूजन्य आजारातही हीच लक्षणे आहेत. त्यामुळे लोकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.


मात्र या परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णांपर्यंत पोहचता यावे यासाठी महापालिका खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन डॉक्टरांना उपचार आणि चाचण्यांबाबत मार्गदर्शन करणार आहे, असे पालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
पालिकेतर्फे फिव्हर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने प्रत्येक विभागात असे फिव्हर क्लिनीक होतील. जेथे जागा उपलब्ध असेल तेथे क्लिनीकचे कॅम्प घेण्यात येणार आहेत. पालिकेच्या दवाखान्यांमध्येही हे क्लिनीक सुरू करण्यात आले आहेत, असे काकाणी यांनी सांगितले.



दरम्यान मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. दिवसभरात २० हजारांच्या जवळपास रुग्णसंख्या नोंदविली जात आहे. त्यामुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. मुंबईकरांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान आता ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पालिकेची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनासह साथीच्या आजारांना रोखण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. दरम्यान ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिकेतर्फे फिव्हर क्लिनीक सुरू करण्यात आले आहे.

Comments
Add Comment