Saturday, July 5, 2025

एजाज पटेलला डिसेंबर २०२१ मधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

एजाज पटेलला डिसेंबर २०२१ मधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

मुंबई : न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलला डिसेंबर २०२१ मधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मान बहाल केला आहे. एजाज पटेलने डिसेंबरमध्ये इतिहास रचला. पटेलने वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या एका डावात १० बळी घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. ही कामगिरी करणारा तो जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांच्यानंतरचा तिसरा गोलंदाज ठरला.


डिसेंबरमध्ये त्याने फक्त एकच कसोटी सामना खेळला, ज्यामध्ये त्याने १६.०७च्या सरासरीने १४ बळी घेतले. पटेलने भारताविरुद्ध पहिल्या डावात सर्व १० विकेट घेतल्या आणि त्यानंतर दुसऱ्या डावात सलामीवीर मयंक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजाराच्या विकेट्ससह चार विकेट घेतल्या. या सामन्यात पटेलची गोलंदाजी २२५/१४ अशी होती. एजाज पटेलच्या कामगिरीवर भाष्य करताना आयसीसी व्होटिंग अकादमीचे सदस्य जेपी ड्युमिनी म्हणाले, ”ऐतिहासिक कामगिरी. एका डावात १० विकेट्स घेणे ही एक कामगिरी आहे, जी साजरी करणे आवश्यक आहे. एजाजची कामगिरी हा एक विक्रम आहे, जो दीर्घकाळ स्मरणात राहील यात शंका नाही.”

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा