Wednesday, March 19, 2025
Homeमहत्वाची बातमीचिंता वाढली! डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता आला डेल्टाक्रॉन

चिंता वाढली! डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता आला डेल्टाक्रॉन

नवी दिल्ली : भारतासह संपूर्ण जग ओमायक्रॉन व्हेरिएंटचा सामना करत असतानाच आता सायप्रसच्या एका शास्त्रज्ञाने आता कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शोध लावला आहे. हा नवा स्ट्रेन कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटचे मिश्रण असल्याचे म्हटले जात आहे. याला डेल्टाक्रॉन (Deltacron) नाव दिले आहे.

ओमायक्रॉन आतापर्यंत सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचे सांगितले जात आहे. तर डेल्टा व्हेरिएंटने मागील वर्षी देशातील अनेक भागात अक्षरशः हाहाकार माजवला होता. अशात आता या दोन्ही व्हेरिएंटच्या मिश्रणातून तयार झालेला व्हेरिएंट किती घातक असू शकतो, याचा अंदाज लावता येईल. सायप्रसच्या संशोधकांनी याच आठवड्यात आपले निष्कर्ष GISAID ला पाठवले. GISAID एक आंतरराष्ट्रीय डेटाबेस आहे, जे व्हायरसला ट्रॅक करतात.

आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायप्रसला डेल्टाक्रॉनची आतापर्यंत २५ प्रकरणं आढळली आहेत. मात्र, कोणत्याही देशाने आतापर्यंत याची पुष्टी केलेली नाही. डेल्टाक्रॉनबद्दल काही व्हायरोलॉजिस्टचं म्हणणं आहे की हा एखादा नवा व्हेरिएंट नाही. याला व्हायरसच्या फायलोजेनेटिक ट्रीवर ट्रेस किंवा प्लॉट करता येणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -