Tuesday, July 1, 2025

ऐरोलीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

ऐरोलीमध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाई

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या अनाधिकृत बांधकामामुळे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानसार ऐरोली विभागामध्ये अतिक्रमण विभागाने अनाधिकृत बांधकामावरील कारवाईचा सपाटा लावला आहे.



अतिक्रमण उपआयुक्त अमरिश पटनिगीरे यांच्या आदेशानव्ये ऐरोली विभाग आधिकारी महेंद्र संप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अंभियता मयुरेश पवार, लिपीक महेश नाईक यांच्या सहकार्याने करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी विभाग ऐरोली विभाग कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या ऐरोली सेक्टर ७ येथील राकेश पार्क सोसायटी जवळ भुखंड क्रमांक ३० येथे रो-हाऊस क्रमांक दोन, ३ व ६ येथे विनापरवानगी अनाधिकृपणे तळमजल्यावरील पार्किंगच्या जागेत नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी न घेता गाळयांचे बांधकाम सुरू होते.
१ जेसीबी, २ मजूर, १गॅस कटर यांच्या सहाय्याने पालिकेने केलेल्या कारवाईमुळे बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments
Add Comment