नवी दिल्ली : देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. गेल्या २४ तासांत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे चिंता वाढली असून देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी आज सायंकाळी साडेचार वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत देशात नवे निर्बंध लावण्याबाबत निर्णय होणार आहे का? याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाबत नवे निर्बंध जारी केले असून आता मोदींच्या बैठकीनंतर राज्याला आणखी काय सूचना येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
PM Modi to chair a meeting to review the COVID-19 situation in the country at 4:30pm today: GoI sources
(file pic) pic.twitter.com/Snpm9q3Chw
— ANI (@ANI) January 9, 2022
गेल्या २४ तासांत दिवसभरात देशात १ लाख ५९ हजार ४२४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४० हजार ८६३ जण कोरोनामुक्त झाले. तसेच कोरोनामुळे ३२७ जणांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हीटी रेट १०.२१ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे मोदींनी महत्वाची बैठक बोलावली असून यामध्ये राज्यांना निर्बंधांबाबत नवे निर्देश देण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे.