Friday, October 31, 2025
Happy Diwali

मुंबई सीबीआय कार्यालयातील ६८ जणांना कोरोनाची लागण

मुंबई सीबीआय कार्यालयातील ६८ जणांना कोरोनाची लागण
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुंबई कार्यालयातील ६८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या सर्व बाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयचे मुंबईतील कार्यालय वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यालयात काम करणाऱ्या २३५ लोकांना चाचणी करण्यास सांगितले होते. त्यापैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >