नवी दिल्ली : भारतात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरण अभियानाने दोन कोटींचा आकडा पार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोग्य यंत्रणेचे-मुलांचे कौतुक करीत नागरिकांना विशेष आवाहन केले.
ट्वीटर द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ” उत्तम! माझ्या तरुण मित्रांनो खूप छान कामगिरी. ही गती अशीच पुढे चालू ठेवूया.
प्रत्येकाला आवाहन करतो की तुम्ही सर्वानी कोविड-१९ संबंधित नियमांचे काटेकोर पालन करा आणि लसीकरण केले नसेल तर अवश्य करून घ्या.”