
सध्याची कोरोना रुग्णसंख्या पाहता गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी कोरोनाची तीव्रता जास्त असल्याचे दिसून येत असून दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेचा कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे रुग्णांवर आधी उपचार करणे गरजेचे आहे.
पालिकेच्या वॉर्ड वॉर रूमच्या माध्यमातून रुग्णांना संपर्कात ठेवले जाणार असून त्यांच्याद्वारे दाखल केले जाणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर रुग्णांवर वेळीच उपचार व्हावे यासाठी ३५ हजारांहून अधिक खाटा पालिकेने तैनात ठेवल्या आहेत.