ठाणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम जिल्ह्यात गतिमान असून ठाणे जिल्ह्यात कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार दिवसभरात ७७ हजार ९०८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ कोटी १३ लाख ८६ हजार १३४ डोसेस देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत पहिला डोस ६५ लाख ११ हजार १८ नागरिकांना, तर ४८ लाख ७५ हजार ११६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शानिवारी दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४८८ सत्र आयोजित करण्यात आले.
६४८३ मुलांचे लसीकरण
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे शहरात १५ ते १८ वयोगटातील १६ लसीकरण केंद्रात ६४८३ मुलांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले असून लसीकरण मोहिमेंतर्गत शहरात एकूण २५ लाख ४९ हजार ९६१ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.