Monday, July 15, 2024
Homeक्रीडाउस्मान ख्वाजाची दोन्ही डावांत शतके

उस्मान ख्वाजाची दोन्ही डावांत शतके

असा पराक्रम करणारा जगातील दहावा फलंदाज

सिडनी: ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज उस्मान ख्वाजाने अॅशेस मालिकेतील चौथ्या सामन्यांत दोन्ही डावांत शतके ठोकण्याची करामत साधली. अशी कामगिरी करणारा तो जगातील दहावा फलंदाज ठरला.
दुसऱ्या डावात ६९व्या षटकात डॅविड मॅलनच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर दोन धावा घेत ख्वाजाने चौथ्या कसोटीतील सलग दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. त्याने १३८ चेंडूंचा सामना करताना नाबाद १०१ धावा काढल्या. त्यात १० चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे. ख्वाजा हा अॅशेस मालिकेत दुहेरी शतक झळकावणारा नववा बॅटर आहे. सिडनी मैदानात डग वॉल्टर्स आणि रिकी पाँटिंगनंतरचा तो तिसरा डबल सेंच्युरियन आहे.

अडीच वर्षांनंतर पुनरागमन केलेल्या ३५ वर्षीय डावखुऱ्या फलंदाजाने ४५वी कसोटी खेळताना सलग दोन शतकांची नोंद केली. पहिल्या डावात १३७ धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाला चारशेपार नेण्यात मोलाची भूमिका बजावली. दुसऱ्या डावातही इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखताना केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही तर सांघिक कामगिरी उंचावण्यात सिंहाचा वाटा उचलला. दुसऱ्या डावात कॅमेरून ग्रीनसह पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला अडीचशेपार नेले. तसेच एकूण आघाडी चारशेच्या घरात नेली.
ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी चौथ्या सत्रात दुसरा डाव ६ बाद २६५ धावांवर घोषित करताना इंग्लंडसमोर ३८८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. सद्य:स्थितीत यजमानांचे पारडे जड असून चौथ्या आणि पाचव्या दिवसातील जवळपास १०० षटके खेळून काढण्यासह सलग चौथा पराभव टाळण्याचे आव्हान पाहुण्या इंग्लिश संघासमोर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -