भिवंडी : राज्यात व देशात कोरोना संक्रमण वाढत असताना भिवंडी शहरातील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये सर्व बँक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बँकेला टाळे लावण्याची वेळ बँक प्रशासनावर आली आहे.
शाखा व्यवस्थापक यांसोबत एकूण पाच कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली; परंतु ग्राहकांमध्ये संक्रमण वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून बँकेबाहेर नोटीस लावून बँकेला टाळे ठोकले आहे.
शनिवार रविवार सुट्टी असल्याने सोमवारी नियमित वेळेत बँक दुसऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून सुरू राहील, असे बँक प्रशासनाने कळविले आहे.