नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालया संदर्भात समोर आलेल्या घटनाक्रमावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी चिंता व्यक्त केली.
शनिवारी या विषयवार माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा मला विश्वास आहे की, केंद्रीय यंत्रणा आणि महाराष्ट्र पोलिस याबाबत योग्य खबरदारी घेतील. मात्र यास अतिशय गांभीर्याने घेतले पाहिजे असे माझे मत आहे. “