Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

जानेवारीतही पाऊस; मुंबईत हलक्या सरींसह धुके

जानेवारीतही पाऊस; मुंबईत हलक्या सरींसह धुके
मुंबई: मुंबईकरांना जानेवारीतही पाऊस अनुभवायला मिळाला. शहर आणि उपनगर परिसरात शनिवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पश्चिम उपनगरात अंधेरी गोरेगाव, कुर्ल्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडला. काही ठिकाणी तर पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक भागांमध्ये धुकेही पाहायला मिळाले. राज्याच्या काही भागांत ७ ते १० जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्याचा प्रत्यय शनिवारी आला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस, तर विदर्भात काही भागांत गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आह़े. राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात चक्रीय चक्रवात कार्यरत झाला आहे. या भागातून राज्याच्या दिशेने बाष्प येत आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रातूनही जमिनीच्या दिशेने बाष्प येत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाने हजेरी लावली.
Comments
Add Comment