ठाण्यात उद्यापासून मनाई आदेश लागू

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी मनाई आदेश लागू केले आहेत. हे मनाई आदेश १० जानेवारी रोजी १ वाजेपासून २४ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंमलात राहतील.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राजमाता जिजाऊ भोसले जयंती, स्वामी विवेकानंद जयंती, १४ जानेवारी रोजी मकर संक्राती, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, बाळासाहेब ठाकरे जयंती होणार आहेत. त्या आनुषंगाने मनाई आदेश लागू केले आहेत.

यामध्ये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, बाळणणे, जमा करणे व तयार करणे, दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, सार्वजनिक घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादीचा समावेश आहे.
या दरम्यान कोणत्याही इसमाचे चित्र किंवा पुढाऱ्यांच्या चित्र, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्यातील शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक, प्रदर्शित करणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे आदींचा यामध्ये समावेश राहणार आहे.

जे सरकारी नोकर आहेत किंवा ज्यांस वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सूट दिलेली आहे, त्यांना सदर मनाई आदेश लागू राहणार नाहीत.
दरम्यान लग्न, प्रेत यात्रा, कोर्ट, सरकारी, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा, मिरवणुका. सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण, या ठिकाणी हे आदेश लागू राहणार नाहीत.
मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त, जयजीत सिंह यांनी कळविले आहे.
Comments
Add Comment

...म्हणून रोहित आर्यशी बोलले नव्हते माजी मंत्री दीपक केसरकर

मुंबई: मागील आठवड्यात पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलेल्या मुलांच्या घटनेनंतर सर्वत्रच भीतीदायक वातावरण

मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी केला छळ! दोन अधिकारी निलंबित

मुंबई: मुंबईहून मुन्नारला पर्यटनासाठी गेलेल्या महिलेचा टॅक्सीचालकांनी छळ केल्याची घटना समोर येत आहे. संबंधित

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारीपर्यंत लागू करण्याच्या दृष्टीने आराखडा तयार करा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या सूचना मुंबई  : मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना २६ जानेवारी २०२६

भारतातील अस्वच्छ शहरांमध्ये मुंबईचा समावेश, दिल्लीलाही टाकले मागे

मुंबई: स्वच्छता सर्वेक्षण २०२४-२५ च्या अहवालात स्वच्छतेच्या आधारावर भारतातील शहरांचे क्रमांक जाहीर करण्यात

Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी 'हृदय शस्त्रक्रिया'; प्रकृती स्थिर, काही दिवस सक्तीची विश्रांती

मुंबई : महाराष्ट्राचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर मुंबईतील एशियन

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार अवघ्या १५ मिनिटांत; दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम वेगात

मुंबई : देशातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब शहरी बोगदा रस्ते मार्ग म्हणजे ठाणे ते बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प