Wednesday, July 2, 2025

जव्हार भाजपाकडून पंजाब सरकारचा निषेध

जव्हार भाजपाकडून पंजाब सरकारचा निषेध
जव्हार :पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा घेण्यासाठी जात असताना आंदोलकांनी रस्ता अडवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा बुधवारी एका उड्डाणपुलावर सुमारे २० मिनिटे अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदी नियोजित सभा न घेताच दिल्लीला परतले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या गंभीर त्रुटीवरुन मोठा राजकीय वाद उफाळला आहे. यावर संतप्त झालेल्या जव्हार भाजपने पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणाऱ्या पंजाब सरकारचा निषेध केला आहे.

यावेळी भाजपा पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, राष्ट्रीय जनजाती सदस्य हरिश्चंद्र भोये, बाबाजी कोटोळे, पालघर जिल्हा परिषदेच्या सदस्या सुरेखा थेतले, डॉ. हेमंत सवरा, जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल उदावंत, पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन सटानेकर,शहरअध्यक्ष नागेश उदावंत, चेतन पारेख, सुधाकर गावित, उमेश नायकर, विलास चव्हाण,तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत गंभीर चूक घडल्याने मोठे वादळ उठले असून यामागे खूप मोठे षडयंत्र होते, असा दावाही करण्यात येत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा