मुंबई : सोने – चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहे. सणासुदीच्या काळात तर दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. मात्र आता नवीन वर्षात सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज २२ ग्रॅम कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत घसरून ४६,५१० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ६०४ रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो.
जाणून घेवूया सोने-चांदीचे आजचे दर-
सोन्याचा आजचा दर : (१० ग्रॅमसाठी)
मुंबई – २२ कॅरेट – ४६,५१० रुपये, २४ कॅरेट – ४८,५१० रुपये
पुणे – २२ कॅरेट – ४६,१३० रुपये, २४ कॅरेट – ४८,६५० रुपये
नागपूर – २२ कॅरेट – ४७,५१० रुपये, २४ कॅरेट – ४८,५१० रुपये
हिंदुस्थान समाचार