Sunday, July 6, 2025

आलिशान गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

आलिशान गाड्या चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी (kolhapur police) मोठी कारवाई करत आलिशान गाड्या चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून कोट्यावधी रुपयांच्या तब्बल 31 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 


बेळगाव कारागृहातून वाहन चोरीचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कोल्हापूर पोलिसांनी केला आहे. नार्कोटिक्स गुन्ह्यात कारागृहात असलेल्या ए. डी. नावाच्या व्यक्तीकडून ही टोळी चालवली जात होती. देशातील सर्व भागात या टोळीचे नेटवर्क होते. कोल्हापुरातील एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना कोल्हापूर पोलिसांच्या हाती हे मोठं घबाड लागलं. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. 


या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन आसाम, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि दिल्ली येथून चोरी  करण्यात आलेल्या 31 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. 


दरम्यान, देशरात ही टोळी कार्यरत असून आलिशान गाड्या चोरणाऱ्या या टोळीत आणखी काही आरोपींचा समावेश आहे का? याचा तपास कोल्हापूर पोलीस करणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.





Comments
Add Comment